स्टारलिंक

परिचय

समजा तुम्हाला पृथ्वीवर कोणत्याही कानाकोपऱ्यात जलदगती इंटरनेट वापरायला मिळालं तर? अगदी जंगलात, दऱ्या-खोऱ्यात तर? तुम्ही म्हणाल हे शक्य नाही. काही जाणकार म्हणतील की या साठी इंटरनेटच विस्तृत जाळ जगभर पसरवावं लागेल. त्यासाठी भरपूर केबल्स लागतील, उपकरणं लागतील. पण एक व्यक्ती हा प्रश्न सोडवण्यासाठी वेगळाच विचार करतोय त्यासाठी तो केबल्स आणि उपकरणांचं जाळं उभारणार नाहीये तर तो चक्क सॅटेलाईटच एक जाळ पृथ्वीभोवती तयार करणार आहे. ते पण थोडे थोडके नव्हे तर तब्बल ४२००० सॅटेलाईटच जाळ पृथ्वीच्या लो-ऑर्बिट मध्ये तयार केलं जातंय. त्यामुळे तुम्ही कुठेही असा जलदगती इंटरनेट वापरणं शक्य होणार आहे.

स्टारलिंक प्रोजेक्ट

Source – Business Insider

एलॉन मस्क या उद्योजकाने स्पेसएक्स कंपनीद्वारे भव्यदिव्य अश्या स्टारलिंक प्रोजेक्टची आखणी केली आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत जवळपास २६० किलोचे सॅटेलाईट पृथ्वीजवळील लो-ऑर्बिट मध्ये सोडण्यात येणार आहे. मे २०१९ मध्ये स्पेसएक्सने ६० सॅटेलाईट अवकाशात सोडले आहेत आणि त्यांची संख्या २०२१-२२ पर्यंत १४४० पर्यंत नेण्याची तयारी सुरु आहे. या प्रोजेक्टवर २०१५ मध्ये काम सुरु करण्यात आलं फेब्रुवारी २०१८ मध्ये २ सॅटेलाईट टेस्टिंग साठी अवकाशात सोडण्यात आल्या होत्या.

फेब्रुवारी २०२१ मध्ये स्टारलिंक वापरण्यासाठी नोंदणी सुरु देखील करण्यात आली आहे. तुम्ही इथे नोंदणी करू शकता.

स्टारलिंक प्रोजेक्टद्वारे स्पेसएक्सला २०२५ पर्यंत, ३० बिलियन डॉलर्सची वार्षिक कमाई होण्याची शक्यता वाटत आहे. या कमाईद्वारे स्पेसएक्स मंगळग्रहावर मनुष्य वसाहत तयार करेल.

पृथ्वीपासून ११०० किलोमीटर उंचीवर ४२००० सॅटेलाईट सोडण्यासाठी स्पेसएक्सने फेडरल कॉम्युनिकेशन कमिशनला परवानगी मागितली आहे आणि त्यावर सध्या चर्चा सुरु आहेत. सौरउर्जेवर चालणाऱ्या या सॅटेलाईट एकमेकांशी कनेक्टेड असतील.

Source – Forbes

सॅटेलाईटद्वारे इंटरनेट वापरण्यासाठी ग्राहकांना एक विशिष्ट अँटेना (टीव्ही डिश सारखा) वापरावा लागेल, हा अँटेना डाऊनलिंक रिसिव्ह करायचं काम करेल.

जर स्पेसएक्स या प्रोजेक्टमध्ये यशस्वी झालं आणि ग्राहकांना कमी किंमतीत हि सेवा उपलब्ध झाली तर सर्वदूर आणि सर्वांसाठी इंटरनेटच स्वप्न पूर्ण होईल. 

अडथळे

१. इतक्या मोठ्या संख्येने पृथ्वीभोवती सॅटेलाईटच जाळ तयार झाल्यास, खगोल शास्त्रज्ञाना अवकाश निरीक्षण करताना अडचणी येऊ शकतात. हि समस्या सोडविण्यासाठी स्पेसएक्स डार्कसॅट तयार  करत आहेत. यामध्ये सॅटेलाईटचे परावर्तित करणारे भाग आणि इतर काही भाग काळ्या रंगात असतील. याने हि समस्या पूर्णपणे संपणार नसली तरी सध्या यावर काम सुरु आहे.

२. भविष्यात अवकाश उड्डाण करण्यात अडथळे येऊ शकतात.

३. स्पेस डेब्रिस – जर सॅटेलाईट निकामी झाली तर अवकाश कचऱ्यात भर पडेल. स्पेसएक्सच्या मते या सॅटेलाईट स्वतः १ महिन्याच्या आत नष्ट होतात.

४. केस्लर सिंड्रोम – जर एका वेळी अनेक सॅटेलाईट निकामी होऊन त्या सॅटेलाईट इतर सॅटेलाईटना निकामी करत गेल्या तर मोठ्या प्रमाणावर स्पेस डेब्रिस तयार होईल. पण याची शक्यता अगदी नगण्य आहे.

५. स्पर्धा – अमेझॉन कूपर आणि वनवेब हे प्रोजेक्ट्स देखील सारख्याच सेवा पुरवण्यावर काम करत आहेत.        

निष्कर्ष

स्टारलिंक हा एक नक्कीच खूप महत्वकांक्षी प्रोजेक्ट आहे त्याचा फायदा मानवजातीला नक्कीच होणार आहे पण पृथ्वीला इतक्या सॅटेलाईटने आच्छादने कितपत योग्य आहे हा प्रश्न आहेच, त्याच उत्तर येणाऱ्या काळात मिळेलच आणि स्टारलिंक प्रोजेक्टच्या परवानगीबद्दल योग्य तो निर्णय फेडरल कॉम्युनिकेशन कमिशन घेईलच.

starlink akash jadhav spacex satelite


संबंधित व्हिडिओ


Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.