सॅमसंग अनपॅक २०२१

परिचय

दरवर्षी प्रमाणे सॅमसंगचा अनपॅक हा भव्यदिव्य सोहळा जानेवारी १४, २०२१ ला पार पडला. यात सॅमसंगने तीन नवीन स्मार्टफोन सादर केले. त्याचबरोबर गॅलेक्सी बड्स प्रो सादर करून ईअर बड्स च्या स्पर्धेत आपलं स्थान निर्माण केलं आणि तथाकथित अँपलच्या एअरटॅग्स बाजारात येण्यापूर्वीच स्मार्टटॅग सादर करून बाजी मारली.    

Source – Samsung

गॅलेक्सी बड्स प्रो

तीन विविध रंगात सॅमसंगने वायरलेस ईअर बड्स सादर केले. गॅलेक्सी बड्स प्रो च डिजाईन मानवी कानाच्या आकाराला अनुसरून बनविण्यात आलं आहे. यातील अल्गोरिदम जेव्हा तुम्ही बोलत असाल किंवा एखाद्या संभाषणात असाल तर तेव्हा तुमचा आवाज ओळखुन नॉईस कॅन्सलेशन चालू / बंद करतं. इंटेलिजेंट नॉईस कॅन्सलेशन तंत्रज्ञान तुमच्या कानाच्या आतील आवाज आणि बाह्य जगातील आवाज मोजून ९९ टक्क्यांपर्यंत नॉईस कॅन्सलेशन करतं. सर्व दिशांनी (३६० डिग्री) आवाज ऐकू येत असल्याचा भास निर्माण करण्याची क्षमता या ईअर बड्स मध्ये आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या उपकरणांना अतिजलदगतीने कनेक्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे.  

Source – Samsung

नॉईस कॅन्सलेशन – जेव्हा तुम्ही ईअर बड्स कानात घालून नॉईस कॅन्सलेशन सुरु करता तेव्हा तुम्हाला सभोवतीचा आवाज ऐकू येत नाही.    

गॅलेक्सी स्मार्टटॅग

हे ब्लू-टूथ उपकरण तुम्ही तुमच्या चावी साठी किचेन म्हणून वापरू शकता. जर कधी चावी हरवली तर एका अँप द्वारे तुम्ही चावी शोधू. यात स्मार्टटॅग ब्लू-टूथ सिग्नल इतर उपकरणांना पाठवून माहिती देत. गॅलेक्सी स्मार्टटॅग प्लस एक पाऊल पुढे जात तुम्हाला अँपवर जागा पाठवून देऊ शकतो. दोन्ही स्मार्टटॅग तुम्ही चावी व्यतिरिक्त इतर कोणत्याही महत्वाच्या गोष्टीसोबत किंवा पाळीव प्राण्यांसाठी वापरू शकता.

Source – Samsung

गॅलेक्सी S२१ स्मार्टफोन

सॅमसंगने S२१ सिरीजमध्ये एकूण तीन स्मार्टफोन सादर केले – S२१ अल्ट्रा, S२१+ आणि S२१ . हे सर्व स्मार्टफोन 5G तंत्रज्ञान वापरण्यासाठी सक्षम आहेत. सॅमसंगने S२१ सिरीज मधील स्मार्टफोनचे डिजाईन खूपच भविष्यकालीन बनविले आहे आणि असं डिजाईन यापूर्वी कधीच पाहण्यात आलं नाही आणि ते प्रचंड भाव खाऊन जातं. डिजाईनच्या बाबतीत S२१ सिरीज इतर कोणत्याही स्मार्टफोन पेक्षा उजवं ठरत. या तीनही स्मार्टफोनमध्ये ४००० – ५००० मिलीअँपिअर या रेंज मध्ये तगडी बॅटरी देण्यात आली आहे.

Source – Samsung

S२१ सिरीजमधील चार कॅमेऱ्यांची (१२ मेगापिक्सेल ते १०८ मेगापिक्सेल) सिस्टीम देण्यात आली आहे. यातील टेलीफोटो लेन्स द्वारे तुम्ही स्पेस झूम वापरू शकता म्हणजेच जवळपास ३०X ते १००X पर्यंत झूम करण्याची सुविधा आहे. यातील ए.आय. आय.एस.पी. तंत्रज्ञानमुळे कॅमेरा समोरील वस्तू ओळखता येतात.  कमी अंधारात फोटो काढताना लो-लाईट तंत्रज्ञानमुळे अधिक फायदा होतो आणि फोटो उत्तम येतात.  

Source – Samsung

S२१ अल्ट्रा 8K मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. तर या सिरीजमध्ये  १२८ ते ५१२ जीबी पर्यंत स्टोरेजचे पर्याय देण्यात आलेले आहे. 

S२१ सिरीजची सर्वात जमेची बाजू म्हणजे इन्फिनिटी डिस्प्ले. सॅमसंगच्या मते S२१ सिरीजमध्ये सर्वात कठीण गोरिला काच डिस्प्ले बनविण्यासाठी वापरण्यात आली आहे. हा डिस्प्ले डायनॅमिक एमोलेड २x प्रकारातील आहे.  सॅमसंग जगातील सर्वात उत्तम डिस्प्ले बनविण्यासाठी सर्वश्रुत आहेच त्यात हे डिस्प्ले १२० हर्ट्झला पूरक आहेत त्यामुळे या स्मार्टफोन्स वर व्हिडिओ बघणे एक मेजवानी ठरेल. यातील आय कम्फर्ट तंत्रज्ञानामुळे तुमच्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल. तसच हे फोन्स आता जास्त पाणी आणि धूळ प्रतिबंधक आहेत.     

Source – Samsung

गूगल नेस्ट

सॅमसंगने गूगल सोबत भागीदारी करत काही नवीन प्रोजेक्टवर काम सुरु केले आहेत जस कि कार किंवा घराचे दरवाजे उघडणे बंद करणे. 

निष्कर्ष

कदाचित सॅमसंग हि अँड्रॉइडसाठी जगातील सर्वोत्तम फोन बनविणारी कंपनी आहे. S२१ सिरीज ने जगातील इतर कंपन्यांसाठी एक नवा स्टॅंडर्ड सेट केला आहे. उत्तम हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सर्विसेसमुळे S२१ सिरीज मधील स्मार्टफोन जागतिक स्तरावर नावाजले जातील यात काही शंका नाही.  

samsung unpack event 2021 akash jadhav buds pro s21 smarttags google nest


संबंधित व्हिडिओ


Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.