पर्सीव्हरेन्स रोव्हर

परिचय

१८ फेब्रुवारी २०२१ हा दिवस ऐतिहासिक होता. या दिवशी नासा आणि जेट प्रपल्शन लॅबोरेटरी यांनी संयुक्तरित्या बनविलेल्या पर्सीव्हरेन्स रोव्हरने मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या लँडिंग केली. मंगळावरील जेझेरो भागात संशोधन करण्यासाठी पर्सीव्हरेन्स रोव्हरला पाठविण्यात आलं आहे. पर्सीव्हरेन्स हा आता पर्यंतचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुस्सज असा पहिलाच रोव्हर आहे. यातील तंत्रज्ञान खरच आचंबित करणार आहे. पर्सीव्हरेन्स रोव्हरच्या आधी क्युरॉसिटी रोव्हर मंगळावर उतरलं होत. त्याच रोव्हरच्या डिजाईन मध्ये सुधारणा घडवून आणि अत्याधुनिक उपकरणे बसवून पर्सीव्हरेन्स रोव्हर बनविण्यात आलं.

Source – NASA

मार्स २०२० या मिशन अंतर्गत नासाने  ३० जुलै २०२० रोजी या मिशनच लॉन्चिंग करण्यात आलं. तब्ब्ल ७ महिन्यांचा खडतर प्रवास आणि त्याहून कठीण लँडिंग करत शेवटी पर्सीव्हरेन्स रोव्हर मंगळावर यशस्वीरित्या उतरलं.

या मिशनचा मुख्य उद्देश “पूर्वी मंगळावर जीवन होत का आणि माती आणि दगडांचे नमुने एकत्रित करणे हा आहे.”

तंत्रज्ञान

पर्सीव्हरेन्स रोव्हरच्या डिजाईन मध्ये विशेष बदल करण्यात आले आहेत जेणेकरून हा रोव्हर मंगळ ग्रहावर जास्तीत जास्त काळ टिकेल. या रोव्हरची चाके अल्युमिनियम आणि टायटेनियम यांनी बनविली आहेत. या चाकांना स्प्रिंग सपोर्ट असल्याने खड्यांमधून हा रोव्हर आरामात वाटचाल करू शकतो. त्याच बरोबर यात ६ फुटाचा एक रोबोटिक आर्म देण्यात आला आहे. या रोबोटिक आर्मद्वारे खोदकाम आणि मातीचे नमुने गोळा करणे इत्यादी कामे करता येणे शक्य आहे.

Source – NASA

पर्सीव्हरेन्स रोव्हरच वजन १०२५ किलो आहे आणि आकार एखाद्या कार इतका आहे. या रोव्हरमध्ये रेडिओ-आयसोटोप थर्मोइलेक्ट्रिक पॉवर जनरेटर बसविण्यात आलं आहे. जे युरेनियम-२३८ च इंधन म्हणून वापर करतं आणि पूर्ण रोव्हरला ऊर्जा पोहचवत. युरेनियम-२३८ क्षय होताना उष्णता निर्माण करतं याच उष्णतेला विजेत रूपांतरित करून रोव्हरला ऊर्जेचा पुरवठा केला जातो. युरेनियम-२३८ जवळपास ८७ वर्षापर्यंत क्षय होऊन उष्णता निर्माण करत राहू शकत त्यामुळे पर्सीव्हरेन्स मंगळ ग्रहावर बराच काळ तग धरून राहू शकेल. पण  युरेनियम-२३८ लहान प्रमाणावर रेडिशन निर्माण करत त्यापासून इलेक्ट्रिक उपकरणांना वाचवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.

या रोव्हर मध्ये व्हीएक्स वर्क्स हि ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यात आली आहे. यात ३ अँटेना,  २ मायक्रोफोन आणि हाय रिजोल्यूशन कॅमेरा बसविण्यात आलेले आहेत. पर्सीव्हरेन्स रोव्हर सोबतच इंजेनुइटी हेलिकॉप्टर सुद्धा पाठविण्यात आलं आहे. हेलिकॉप्टर पर्सीव्हरेन्सचा मार्ग निश्चित करण्याचं काम करेल. इंजेनुइटी हेलिकॉप्टर सौरऊर्जेवर चालेल आणि एका वेळी ९० सेकंदांपर्यंत उड्डाण करू शकेल. मंगळ ग्रहावरील हवेचा दाब कमी असल्याने उड्डाण करण्यासाठी पंखे ५ पट अधिक क्षमतेने फिरणे आवश्यक आहेत. विशेष म्हणजे इंजेनुइटी हेलिकॉप्टर हे पृथ्वीवरून कंट्रोल केलं जाईल.   

Source – NASA

त्याचबरोबर यासोबत कमी वजनाचं मॉक्सी हे ऑक्सिजन जनरेटर बसविण्यात आलं आहे. जर मॉक्सी मंगळ ग्रहाच्या वातावरणात यशस्वीरीत्या काम करू शकलं तर भविष्यातील मानवी मोहिमांसाठी एक सुचिन्ह ठरेल. 

निष्कर्ष

मानवाला भविष्यात कधी ना कधी अंतरग्रहीय प्रवास करावाच लागणार आहे. नासा आणि स्पेसेक्स त्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करत आहेत. पर्सीव्हरेन्स (म्हणजेच मराठीत चिकाटी) मानवाला एक दिवस मंगळ ग्रहावर वास्तव्य करण्यास सक्षम बनवेल. नासाच्या अधिकृत वेबसाईटवर पर्सीव्हरेन्स रोव्हरच मुख्य काम “दगड आणि माती गोळा करणे आणि ते कदाचित भविष्यात पृथ्वीवर परत आणणे” असं नमूद केल आहे म्हणजेच नासा मंगळ ग्रहावर मानवी मोहिमेच्या तयारीत असल्याचं दिसतंय. पर्सीव्हरेन्स रोव्हरने आत्याधुनिक तंत्रज्ञानासमवेत मंगळग्रहावर संशोधन सुरु केल आहे आणि वैज्ञानिक त्यातून काय निष्कर्ष काढतील याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहीलेल आहे.        

perseverence rover nasa jet jet propulsion laboratory akash jadhav mars


संबंधित व्हिडिओ


Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.