न्युरालिंक

परिचय

जगात काही मोजके संशोधन असे होत आहेत जे मोठे बदल घडवून आणू शकतात, न्युरालिंक त्यापैकी एक. एलोन मस्क आणि इतर तज्ज्ञांनी मिळून २०१६ मध्ये न्युरालिंकची स्थापना केली. या कंपनीमध्ये प्रतिष्ठित विद्यापीठांमधील अनेक तज्ज्ञ न्युरोसायन्टिस्ट, सॉफ्टवेअर इंजिनिअर काम करत. न्युरालिंकच ध्येय

“मानवी मेंदू आणि संगणक यांमध्ये जलदगती परस्पर दळण-वळण (कम्युनिकेशन) पर्याय (इंटरफेस) बनविणे.”

Source – Neuralink

तंत्रज्ञान

मानवी मेंदू विद्युत लहरींनी शरीराची हालचाल नियंत्रित करतो. जर या विद्युत लहरींचं मापन करून अभ्यास केल्यास आणि तशाच विद्युत लहरी संगणकाद्वारे निर्माण करून शरीर नियंत्रित करणे शक्य झाल्यास अपंगत्वत दूर करण्यास मदत होऊ शकते. तस बघायला गेलं तर २००६-०७ पासून असं तंत्रज्ञान विकसित करण्यावर संशोधन सुरु आहे आणि त्यावर बऱ्याचं अंशी यश आलं आहे असं आपण म्हणू शकतो. आता तर फक्त विचार करून ड्रोन उडविणे शक्य झालं आहे.

Source – Neuralink

न्युरालिंकने एक पाऊल पुढे जात एक असं छोटं उपकरण निर्माण केलाय जे मानवी मेंदूत बसवता येत. या उपकरणाला हजारो, मायक्रॉन लेव्हलच्या तारा आहेत ज्या थेट मेंदुत बसवून मज्जातंतूंशी संपर्क (विद्युत लहरींन द्वारे) साधतील.         

Source – Neuralink

हे उपकरण मेंदुत बसविण्यासाठी न्युरालिंकने बनविलेल्या सर्जिकल रोबोटद्वारे मानवी कवटीचा (स्कल) अगदी छोट्या भागावर ऑपरेशन करून तारा मेंदूच्या आता बसविता येतील. तसेच हे उपकरण मोबाईल प्रमाणे चार्ज देखील करावे लागेल. न्युरालिंकचे कर्मचारी सर्जिकल रोबोटला स्वयंचलित बनविण्यावर आणि उपकरण बसवायचं ऑपरेशन फक्त काही तासात कसं पूर्ण होईल यावर काम करत आहेत.    

Source – Neuralink

न्युरालिंकने हे उपकरण प्राण्यांच्या (त्यांना इजा न पोचवता) मेंदूत बसवून काही यशस्वी प्रयोग केले आहेत. जस कि एखादा प्राणी चालत असताना त्याचा मेंदू एका विशिष्ट्य प्रकारच्या विद्युत लहरींनी शरीराला सूचना देत असतो, न्युरालिंकला या लहरी मोजण्यात यश आलं आहे. अशाच लहरी मानवी मेंदूतुन मोजता आल्या आणि त्याच प्रकारच्या लहरी जर अपंग व्यक्तींनी वापरल्या तर त्यांचं अपंगत्व दूर करता येऊ शकत.

फायदे

न्युरालिंकला कमी अवधीमध्ये अपंगत्वावर मात करणारं तंत्रज्ञान बनवायच आहे. त्यानंतर त्यांना दैनंदिन जीवनातील उपकरणं जस कि स्मार्टफोन, टी.व्ही. यांना देखील विचारांनी नियंत्रित करणारं तंत्रज्ञान विकसित करायचं आहे.

त्रुटी आणि अडथळे

न्युरालिंक प्रोजेक्ट म्हणजे सरळ सरळ निसर्गाला, विज्ञानाला आणि मानवी सरंचनेला आव्हान आहे. न्युरालिंक उपकरणाचा गैरवापर होणे शक्य आहे.  

न्युरालिंक मध्ये काही अंतर्गत वाद चालू असल्याचं बोललं जातंय. कदाचित याला एलोन मस्कची कार्यशैली कारणीभूत असू शकेल. शक्यतो इंजिनीअर्सना कमी कालावधीत मोठे प्रोजेक्ट्स पूर्ण करायला आवडतात तर सायन्स त्यामानाने हळूहळू पुर्णत्वाकडे सरकत जात यामुळे इंजिनीअर्स आणि न्युरोसायन्टिस्ट यांमध्ये मतभेद होऊ शकतात.    

निष्कर्ष

एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला शोभेल अश्या तंत्रज्ञानावर न्युरालिंक काम करत आहे ते जितकं आधुनिक आहे तितकंच भयावह देखील आहे. पण न्युरोसायन्स मधील जाणकार न्युरालिंकच्या कामगिरी आणि प्रगतीमुळे प्रभावित आहेत. जर न्युरालिंकला यात यश मिळाल तर जगातील अपंगत्वाचं प्रमाण कमी होईल त्याच बरोबर न्युरोसायन्स हा दुर्लक्षित विषय प्रकाश झोतात येईल. 


neuralink elon musk neuroscience akash jadhav

संबंधित व्हिडिओ


Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.