आयफोन १२

परिचय

उद्योग जगतात एखादया कंपनीच्या सी.ई.ओ. ने प्रतिस्पर्धी कंपनीच्या प्रॉडक्टची स्तुती करणे विरळच पण काही दिवसांपूर्वी हुवावे कंपनीचे सी.ई.ओ. रेन झेंगफी यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये आयफोन १२ हा जगातील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन असल्याचं सांगितल.

Source – Apple

१३ ऑक्टोबर २०२० मध्ये ॲपलने पहिल्यांदाच ४ नवीन आयफोन एकाचवेळी बाजारात आणले. ॲपलने जवळपास ६ वर्षानंतर (आयफोन एस.ई. वगळता) छोट्या स्क्रीन साईज चा आयफोन म्हणजेच १२ मिनी सादर केला. तर निर्मात्यांसाठी आयफोन १२ प्रो आणि आयफोन १२ प्रो मॅक्स हे दोन; आणि आयफोन १२ सादर केले. नवीन रंग आणि फीचर्स सहित आयफोन १२ सिरीजने विक्रीचे जगभरात नवे उचांक गाठले आहेत. 

Source – Apple

फीचर्स

5G

चारही आयफोन 5G तंत्रज्ञान म्हणजेच मिलीमीटर वेव्हस (युनायटेड स्टेट्स साठी) आणि इतर 5G बॅण्ड वापरण्यासाठी सक्षम आहेत. चारही आयफोन 5G चे जास्तीत जास्त बॅण्ड वापरण्यासाठी डिजाईन केले आहेत. आयफोनचं बाहेरील अल्युमिनियम आवरण अँटेनाच काम करत. 5G सोबतच आयफोनमध्ये “स्मार्ट डेटा मोड” देण्यात आला आहे, जेव्हा 5G नेटवर्कची गरज नसेल तेव्हा आयफोन आपोआप एल.टी.ई. किंवा इतर बॅण्ड वापरून बॅटरीची खपत कमी करेल.

सिरॅमिक शिल्ड

नॅनो सिरॅमिक क्रिस्टल तंत्रज्ञानाद्वारे बनवण्यात आलेली सिरॅमिक शिल्ड ग्लास आयफोन १२ मध्ये वापरण्यात आली आहे. ॲपलच्या मते सिरॅमिक शिल्ड ग्लास बनविणे अत्यंत गुंतागुंतीचं काम आहे कारण सिरॅमिक पारदर्शी नसतात. सिरॅमिक शिल्डमुळे आयफोन आता ४ पट अधिक मजबूत झाला आहे.

डिजाईन

आयफोन ५ च्या चौकोनी डिजाईनचे अनेक चाहते आजही आहेत. त्याच चौकोनी डिजाईनचा पुनर्वापर नव्या स्वरूपात आयफोन १२ मध्ये करण्यात आला आहे. यात एरोस्पेसग्रेड अल्युमिनियम बाह्य आवरण बनविण्यासाठी वापरण्यात आलं आहे.

Source – Apple

A14 बायोनिक चिप

जगातील सर्वात जलद स्मार्टफोन प्रोसेसर A14 बायोनिक चारही आयफोन देण्यात आला आहे. या प्रोसेसरवर अब्जावधी ऑपरेशन्स काही क्षणात पूर्ण होतात. A14 बायोनिकमुळे स्मार्टफोनवर डॉल्बी व्हिजन व्हिडिओस रेकॉर्ड करता येतात त्याचबरोबर बॅटरी खपत कमी करण्यासाठी या प्रोसेसरच डिजाईन उपयुक्त आहे.

डिस्प्ले

या सर्व आयफोनमध्ये OLED डिस्प्ले देण्यात आले आहेत आणि पिक्सेल डेन्सिटी मागील आयफोन पेक्षा दुप्पट करण्यात आली आहे. यामुळे आयफोनमध्ये कन्टेन्ट बघणे आता अजून मजेशीर होणार आहे.

Source – Apple

कॅमेरा

आयफोन विविध प्रकाशात उत्तम फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आयफोन १२ मध्ये डॉल्बी व्हिजन व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. कॅमेरा हार्डवेअरमध्ये विशेष बदल करण्यात आलेले नसले तरी मशीन लर्निंगचा वापर करून उत्तम फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर आता सेल्फी कॅमेरामध्येसुद्धा नाईट मोडचा समावेश करण्यात आला आहे.

Source – Apple

मॅगसेफ

चारही आयफोनमध्ये मागील बाजूस एक चुंबकीय वर्तुळ बसविण्यात आलेलं आहे याद्वारे तुम्ही आयफोन चार्ज करू शकता. मॅगसेफमुळे नवीन ऍक्सेसरीज आयफोनसाठी तयार केल्या जातील. मॅगसेफमध्ये NFC रीडर असल्यामुळे ॲपल लवकरच एअरटॅग सादर करेल आणि पुढील आयफोनमध्ये फक्त मॅगसेफद्वारे वायरलेस चार्जिंगचा पर्याय देऊन सर्व पोर्ट काढून टाकण्यात येतील असं बोललं जातंय.

Source – Apple

निष्कर्ष

सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची एकसंध बांधणी दर्जेदार आणि उत्तम डिजाईन व सर्व्हिस या सर्व गोष्टींमुळे चारही आयफोन इतर स्मार्टफोनपेक्षा उजवे ठरतात. असं असलं तरीहि जर तुम्ही आयफोन १२ घेणार असाल तर तुम्हाला फोनच्या बॉक्समध्ये चार्जिंग अडॅप्टर आणि हेडफोन्स मिळणार नाहीत (ॲपलने पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.) त्यामुळे त्यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागतील.  

apple iphone 12 pro max mini akash jadhav


संबंधित व्हिडिओ


Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.