इथेरियम

परिचय

इथेरियम हे एक विस्तारित इंटरनेट (डीसेंट्रलाईज्ड इंटरनेट) प्लॅटफॉर्म (किंवा ब्लॉकचेन) आहे ज्यात स्मार्ट काँट्रॅक्ट्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. इथर (ETH) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आभासी चलन आहे. विटालिक बुटेरिनने २०१३ मध्ये इथेरियमची संकल्पना मांडली. २०१४ मध्ये क्राउडफंडिंगद्वारे इथेरियमला आर्थिक पाठबळ मिळाल. ७ कोटी कॉईन्स सहित ३० जुलै २०१५ रोजी इथेरियम अस्तित्वात आल. इथेरियम हे जगातील सर्वात जास्त वापरलं जाणार ब्लॉकचेन आहे तर इथेरियमला अर्थसहाय्य करण्यासाठी इथरचा वापर केला जातो.   

तंत्रज्ञान

बिटकॉइनच्या वापरानंतर विटालिक बुटेरिनला असं वाटलं कि ब्लॉकचेनचा वापर फक्त क्रिप्टोकरन्सी करीता मर्यादित नसून त्याचे इतरहि अनेक उपयोग होऊ शकतात. त्यामुळे इथेरियम हे एक जागतिक ब्लॉकचेन म्हणून उभारण्यात आल आणि याचा वापर कोणीही विविध कामांसाठी करू शकतो. जसे स्मार्टफोन मध्ये विविध अँप्स असतात तसेच इथेही विविध अँप्स असतील. पण त्यांना अँप न संबोधता डॅप् (डीसेंट्रलाईज्ड अँप) संबोधतात. डॅप् हे सामान्य अँप पेक्षा वेगळे असतात आणि त्यांची कार्यपद्धती वेगळी असते. डॅप् वर कोणत्याही कंपनीचं नियंत्रण नसत.    

इथेरियम मध्ये प्रोग्रामर सॉलिडिटी भाषेचा वापर करून स्मार्ट काँट्रॅक्ट्स (किंवा डॅप्) बनवू शकतात. हे स्मार्ट काँट्रॅक्ट्स इथेरियमवर आणण्यासाठी त्यांना इथर कॉईनमध्ये पैसे द्यावे लागतात. एकदा स्मार्ट काँट्रॅक्ट् इथेरियमवर आला कि त्याला कोणीही बदलू शकत नाही अगदी ज्याने तो लिहिला आहे तो प्रोग्रामर देखील बदलू शकत नाही.

निष्कर्ष

इथेरियम जगभर प्रसिद्ध आहे त्यामुळे आता याच ब्लॉकचेनवर विविध डॅप् बघायला मिळतील. भविष्यात मतदान देखील याच ब्लॉकचेनवरून झालं तरी त्यात आश्चर्य वाटायला नको कारण इथेरियम पूर्णतः पारदर्शी आहे आणि त्यात कोणीही बदल करू शकत नाही.

ethereum vitalik buterin akash jadhav ether eth etc


संबंधित व्हिडिओ


Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.