डोजकॉईन

परिचय

बिली मार्कस आणि जॅक पाल्मर यांनी चक्क “शिबा ईनु” प्रजातीच्या श्वानाचा फोटो (मिम) वापरून क्रिप्टोकरन्सी अस्तित्वात आणली आणि क्रिप्टोकरन्सी बनविणे किती सहज गोष्ट आहे हे जगाला दाखवून दिल. मजेसाठी सुरु करण्यात आलेला डोजकॉईन प्रोजेक्टला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रेडिटवर देखील हा कॉईन भलताच लोकप्रिय झाला. इतर कॉईन हे लोक त्यांच्या फायद्यासाठी सुरु करत असताना डोजकॉईन निव्वळ मजेसाठी सुरु करण्यात आला. डोजकॉईन बनविणाऱ्यांचा स्वतःचा आर्थिक हेतू नसल्याचं स्पष्ट झाल्यावर लोकांनी डोजकॉईनला उचलून धरलं. त्यातच एलोन मस्क ने डोजकॉईनबद्दल ट्विट केल्यामुळे जागतिक स्तरावर डोजकॉईन प्रकाशझोतात आलं आणि त्याची किंमत वधारली.

डोजकॉईन हि एक क्रिप्टोकरन्सी असली तरी त्यामागे भक्क्कम समूह उभा आहे आणि ते अनेक सामाजिक उपक्रम करत आहेत. २०१४ मध्ये हिवाळी ऑलिंपिक्स साठी पात्र असलेल्या जमैकाच्या टीमला आर्थिक पाठबळ पुरवण्याचं काम डोजकॉईन समूहाने एकत्रितरित्या केलं. त्याच बरोबर शिवा केशवनला देखील त्यांनी अर्थसहाय्य केलं.

त्यानंतर केनिया मध्ये नदीजवळ विहीर खोदण्यासाठी डोनेशन्स स्वीकारण्यात आले. त्यानंतर NASCAR मधील ड्रायव्हरला क्राउड फंडिंग द्वारे मदत केली.

निष्कर्ष

असंख्य क्रिप्टोकरन्सी बाजारात उपलब्ध असताना देखील नवीन क्रिप्टोकरन्सी बनविणे खूप सोपी गोष्ट आहे हे डोजकॉईनने दाखवून दिल आहे. जे लोक कोणत्याही क्रिप्टोकरन्सीवर आंधळेपणाने विश्वास ठेऊन गुंतवणूक करत आहेत त्यांनी याबद्दल अधिक समतोल विचार करायला हवा. डोजकॉईनने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे कि चांगली सामाजिक कार्ये क्रिप्टो आणि ब्लॉकचेन वापरून करता येणे शक्य आहे.          

dogecoin akash jadhav billy markus jack palmer


संबंधित व्हिडिओ


Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.