डिप वेब

परिचय

इंटरनेट हे एक विस्तृत जाळं आहे हे आपल्याला माहिती आहे. पण सामान्यतः आपण इंटरनेटचा जो भाग वापरतो त्याला सरफेस वेब म्हणतात. सरफेस वेबमध्ये गूगल, युट्यूब, फेसबुक, विकिपीडिया आणि इतर अशा असंख्य वेबसाईट्स येतात. पण इंटरनेट म्हणजे फक्त या वेबसाईट्स नव्हे तर त्या फक्त इंटरनेटचा एक भाग आहे. सरफेस इंटरनेटच्या व्यतिरिक्त इतर असंख्य वेबसाईट्स उपलब्ध आहेत पण त्या सामान्य वापरासाठी नाहीत. या वेबसाईट कोणत्याही सर्च इंजिन वर इंडेक्स केल्या नसल्याने तुम्हाला या वेबसाईट्स तुम्हाला गूगल किंवा इतर प्रकारे सर्च करून मिळणार नाहीत. यातील काही वेबसाईट तर पासवर्डने सुरक्षित आहेत. सोप्या भाषेत गूगल सर्च मध्ये तुम्हाला न भेटणाऱ्या वेबसाईट्सच्या समूहाला तुम्ही डिप वेब म्हणू शकता.

Source – Noteworthy Courtesy – Medium

डिप वेब ऐवजी डार्क वेब संकल्पना जास्त लोकप्रिय आहे पण या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. डार्क वेब हा डिप वेबचा एक भाग आहे. डिप वेब हि एक संकल्पना आहे असं गृहीत धरा आणि डार्क वेब हा त्या संकल्पनेचा अनधिकृत वापर. 

डीप वेब मध्ये अनेक माहितीचे स्रोत येतात जस कि अधिकृत कागदपत्रे, मिलिटरी सिक्रेट्स, अर्थविषयक माहिती, कॉपीराईटेड माहिती इत्यादी. हि माहिती सुरक्षित किंवा असुरक्षित असू शकते. त्याची पूर्ण जबाबदारी माहिती साठवून ठेवणाऱ्यावर अवलंबून असते.

डिप वेब मध्ये गोपनीयतेला फार महत्व दिल जात. तुम्ही कोण आहात आणि कुठून माहिती एक्सेस करत आहात याला इथे अजिबात महत्व नाही. समजा तुमच्या देशात एखाद्या विषयावर चर्चा करणे शक्य नसल्यास तुम्ही डिप वेब वापरून इतरांशी चर्चा करू शकता किंवा तुमच्या देशात समलैगिंकतेला मान्यता नसेल तर तुम्ही समान रुची असणारे लोक इथे शोधू शकता. काही देशांमध्ये विकिलिक्स वेबसाईट वर बंदी घालण्यात आली आहे पण डिप वेबमध्ये हि वेबसाईट तुम्ही बघू शकता. डिप वेबचाच एक भाग असलेला डार्क वेबद्वारे अवैध अमली पदार्थ, हत्यारांची तस्करी होते.

डिप वेब वापरण्यासाठी टॉर ब्राऊजर वापरतात आणि अधिक सुरक्षेसाठी टेल्स हि ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात जी तुमच्या माहितीचे कोणतेही पुरावे मागे सोडत नाही. टॉर ब्राऊजर प्रत्येक वेळी तुमचा नवीन ऍड्रेस बनवत त्यामुळे तुम्ही नक्की कुठे आहात हे समजणं कठीण होत. असं असलं तरीही डिप वेब वापरण्यात काही धोकेही आहेत. आणि डिप वेब  हे सरफेस वेब पेक्षा खूप धीम्या गतीने चालतं.

निष्कर्ष

डिप वेबचा वापर गोपनीय माहितीचे स्रोत जगापासून सुरक्षित ठेवणे आहे पण डार्क वेबमुळे त्याचा गैरवापर देखील होतो. इंटरनेट हे एक माहितीच विस्तृत जाळं आहे त्याचे फायदे-तोटे तर आहेच पण सामान्य लोकांपासून अलिप्त अश्या असंख्य गोष्टी या इंटरनेटच्या पोटात आहेत. आपण नक्की काय वापरतोय हे बऱ्याच लोकांना माहित नाही. बलाढ्य कंपन्या निव्वळ कमाईसाठी सामान्य लोकांच्या गोपनीयतेची फिकीर न करता मनमर्जी कारभार करत आहेत. डिप वेब प्रमाणेच सरफेस वेब वर देखील लोकांच्या गोपनीयतेची सुरक्षित ठेवली गेली पाहिजे.

deep web dark akash jadhav


संबंधित व्हिडिओ


Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.