ब्लॉकचेन

परिचय 

ब्लॉकचेन म्हणजेच “विस्तारित पक्की खतावणी तंत्रज्ञान” (डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी) मध्ये जगात अमुलाग्र बदल घडवण्याची क्षमता आहे. काहींच्या मते तर ब्लॉकचेनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्राला डिसरप्ट (बदल) करण्याची क्षमता आहे. २०२० मधील ब्लॉकचेनची स्थिती आणि इंटरनेटची सुरुवातीची स्थिती समान आहे अस जर गृहीत धरलं तर ब्लॉकचेनमध्ये किती मोठं सामर्थ्य आहे याची तुम्हाला कल्पना येईल. पण तो पल्ला गाठायला अजून बराच अवकाश आहे.

पिअर-टू-पिअर तंत्रज्ञानावर आधारित ब्लॉकचेन (लेजर / खतावणी / लिस्ट) एकाच वेळी असंख्य सर्व्हर्सवर उपलब्ध असतं. या ब्लॉकचेनमधील एंट्री (किंवा माहिती ) सर्वांना बघता येते पण त्यात बदल करता येत नाही. ब्लॉकचेनमधील एंट्री सार्वजनिक असल्याने कोणत्याही एका व्यक्तीला यावर संपूर्ण ताबा मिळवणे जवळ जवळ अश्यक आहे. तरीही ते हॅक करता येऊच शकत नाही असं नाहीये, ब्लॉकचेन देखील हॅक होऊ शकतं (५१ टक्के अटॅक).

*पिअर-टू-पिअर तंत्रज्ञानामध्ये दोन किंवा अधिक संगणक एकमेकांसोबत रिसोर्सेस (फाइल्स, टास्क) शेअर (सामायिक) करतात.           

ब्लॉकचेन स्ट्रक्चर

साधारणपणे इंटरनेटवरील डेटा डेटाबेस मध्ये साठवला जातो. ब्लॉकचेनमध्ये सुद्धा डेटाबेस वापरला जातो पण त्याचं स्वरूप वेगळ असतं. ब्लॉकचेनमध्ये एका मोठ्या लिस्टमध्ये (लेजर) डेटा साठवला जातो. हि लिस्ट सर्वांसाठी खुली असते. नेटवर्कमधील लोक ती लिस्ट पाहू शकतात, कॉपी करू शकतात. ज्यांच्याकडे या लिस्टची कॉपी असते त्यांना नोड म्हणतात. असे असंख्य नोड्स एकावेळी उपलब्ध असू शकतात आणि त्यांच्याकडे लिस्टची कॉपी असू शकते. जर लिस्टमध्ये नवीन एंट्री झाली तर नेटवर्कमधील सर्व नोडस् ना नवीन एंट्री बद्दल कळवण्यात येत आणि ती नवीन एंट्री जोडण्यात येते.

नावाप्रमाणेच ब्लॉकचेन हि एक साखळी आहे असंख्य ब्लॉक्सची. यात ब्लॉक्समध्ये एंट्री साठवली जाते आणि त्यासोबतच त्याचा हॅश आणि मागील एंट्रीचा हॅश सुद्धा साठवला जातो. हॅश म्हणजे जो डेटा साठवला आहे त्याची एकमेव अशी किंमत. जर डेटा कोणी बदलला तर हॅशची किंमत बदलते. प्रत्येक ब्लॉकमध्ये मागील ब्लॉकचा हॅश असतो जर मागील ब्लॉकमधील डेटा बदलला गेला तर त्याचा हॅश बदलतो आणि पुढील ब्लॉक सोबतची लिंक तुटते. यापद्धतीने जर कोणी डेटा बदलण्याचा पर्यंत केला तर सर्वाना लगेच समजेल कि कोणता ब्लॉक बदलण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे डेटामध्ये प्रचंड पारदर्शकता येते.

जरी एखादा नोड बंद झाला तरी नेटवर्कमधील असंख्य नोडपैकी एका नोडवर तरी हवी असलेली माहिती उपलब्ध असणारच. कधी कधी बँकेचे सर्व्हर्स बंद असतात किंवा हॅक होतात पण ब्लॉकचेनमुळे हि समस्या नाहीशी होईल. वरवर  बघायला गेलं तर ब्लॉकचेन साधारणपणे लिंक-लिस्ट सारखं वाटेल पण खरं आव्हान त्याला विस्तारित (डिस्ट्रीब्युटेड) नेटवर्कला अनुसरून बनवणे यात आहे. यावर बरेच स्टार्टअप्स काम करत आहेत तर काही मोठ्या कंपन्या ब्लॉकचेनला स्टॅण्डर्डाइज करू पाहत आहेत.

प्रायव्हेट ब्लॉकचेन

ब्लॉकचेन हे एक तंत्रज्ञान असल्याने त्यात बदल करून आपल्या सोयीनुसार वापरू शकतो. प्रायव्हेट ब्लॉकचेन कंपनी आपल्या अंतर्गत कामकाजासाठी वापरते. वॉलमार्ट आणि आय.बी.एम. या कंपन्यांनी तर त्यांचं सप्लाय-चेन मॅनेजमेंट ब्लॉकचेनवर आधारित केलं आहे.  

स्मार्ट काँट्रॅक्ट्स

स्मार्ट काँट्रॅक्ट्सच वैशिष्ट्य असं कि ते एकदा बनवल्यानंतर बदलता येत नाहीत, ते ब्लॉकचेनमध्ये असतात आणि ब्लॉकचेनप्रमाणेच त्याच्या असंख्य कॉपी उपलब्ध असतात. स्मार्ट काँट्रॅक्ट्स हा ब्लॉकचेन मधील प्रोग्रॅम असतो तो एखाद्या घटनेनंतर स्वतःहुन ठरवून दिलेल काम पूर्ण करतो. स्मार्ट काँट्रॅक्ट्समुळे ब्लॉकचेनला स्वयंचलित बनवता येणे शक्य झालं आहे. आणि एखाद्या गोष्टीत जितका मानवी हस्तक्षेप कमी तितकी ती गोष्ट पारदर्शक राहते.    

उपयोग

ब्लॉकचेनचा सर्वांना माहित असलेला उपयोग म्हणजेच क्रिप्टोकरन्सी. बिटकॉइनमुळेच ब्लॉकचेन तंत्रज्ञान चर्चेत आलं आहे. ब्लॉकचेन इतर गोष्टींसाठी जस कि सप्लाय-चेन मॅनेजमेंट, टॅक्स कलेक्शन, लोन देणे, क्राउडफंडिंग इत्यादी गोष्टीसाठी देखील वापरता येऊ शकतं.

निष्कर्ष

एकूणच ब्लॉकचेनला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचायला अजून बराच काळ लागेल कारण ब्लॉकचेनमधील काही त्रुटी (जस कि प्रूफ-ऑफ-वर्क साठी लागणारी ऊर्जेची खपत) अजूनही नीट करायच्या आहेत. असं असलं तरीहि ब्लॉकचेन जग बदलेल असं छातीठोकपणे सांगणारे असंख्य लोक तुम्हाला इंटरनेट वर मिळतील. बरेचलोक ब्लॉकचेनमुळे लोकांना खऱ्या अर्थाने लोकशाही अनुभवता येईल असंदेखील म्हणतायेत असो ब्लॉकचेनच भविष्य काय आहे ते लवकरच आपल्याला समजेल पण मोठे बदल नक्कीच होणार यात शंका नाही.        

blockchain akash jadhav smart contracts distributed computing

संबंधित व्हिडिओ

Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.