ॲपल स्प्रिंग लोडेड इव्हेंट एप्रिल २०२१

२० एप्रिल २०२१ रोजी भारतीय वेळेनुसार १० वाजून ३० मिनिटांनी ॲपलचा बहुप्रतीक्षित “स्प्रिंग लोडेड” हा कार्यक्रम प्रक्षेपित झाला. २०२१ मधील हा ॲपलचा पहिला कार्यक्रम असल्याने ॲपल कोणते नवीन प्रोडक्ट्स बाजारात घेऊन येणार यावर सर्वांच लक्ष होत. कार्यक्रमाच्या नावाप्रमाणेच (“स्प्रिंग लोडेड”) यात अनेक प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दल घोषणा करण्यात आल्या.

Image By – Apple

ॲपलने एअरटॅग, नवीन एम. वन  आयमॅक, एम. वन चिप सहित आयपॅड आणि ॲपल टिव्ही 4K या प्रोडक्ट्सची घोषणा केली. या प्रोडक्ट्सबद्दल आणि कार्यक्रमातील इतर महत्वाच्या घडामोडींबद्दल अधिक माहिती:

ॲपल पॉडकास्ट

ॲपलच लोकप्रिय पॉडकास्ट ॲप आता नव्या डिजाईन सहित लोकांच्या भेटीला येणार आहे. यात प्रत्येक पॉडकास्टसाठी स्वतंत्र कव्हर पेज आणि एपिसोड्स सहजरित्या शोधण्यासाठी बदल करण्यात आले आहेत. तसेच १७० देशांमध्ये ॲपल, पॉडकास्ट ॲपसाठी सदस्यत्व (सब्क्रिप्शन) सुरु करणार आहे. 

Image By – Apple

आयफोन १२ (पर्पल)

Image By – Apple

ॲपलने या कार्यक्रमात आयफोन १२ सिरीजसाठी पर्पल (फिकट जांभळा) या नव्या रंगाचा पर्याय सादर केला आहे.

एअरटॅग

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित एअरटॅग अखेर ॲपलने “स्प्रिंग लोडेड” या कार्यक्रमात सादर केले. इंटरनेटवर एअरटॅगबद्दल अनेकदा माहिती प्रसारित झाली होती पण मागील दोन्ही कार्यक्रमांत एअरटॅगला स्थान मिळालं नाही. मुळात एअरटॅग हे एक छोटंस इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू सोबत ठेवू शकता. जर एखादी वस्तू हरवली तर एअरटॅगद्वारे ती तुम्ही शोधू शकता. एअरटॅग तुम्ही चावी, बॅग, पाकीट किंवा कोणत्याही वस्तू सोबत ठेवू शकता.

तंत्रज्ञान

Image By – Apple

एअरटॅग लो पॉवर ब्लूटूथ द्वारे ॲपलच्या “फाईन्ड माय” नेटवर्कशी संपर्क साधून त्याची लोकेशन नकाशावर दर्शवत. “फाईन्ड माय” हे ॲपलने विकसित केलेलं नेटवर्क आहे ज्यात ॲपल ने विकसित केलेली उपकरणं एकमेकांशी संपर्क साधून ते उपकरण नक्की कोठे आहे याची नोंद ठेवतं. जर तुमचं उपकरण हरवलं किंवा चोरीला गेलं तरी “फाईन्ड माय” ॲपद्वारे तुम्ही ते सहजरित्या शोधू शकता.  एअरटॅगसुद्धा याच कार्यप्रणाली वर काम करतं. हे उपकरण जरी अगदी छोटं असलं तरी यात एक वर्ष चालेल इतकी बॅटरी आहे आणि यात स्पीकर सुद्धा आहे. जर तुम्ही एअरटॅग जवळून गेलात किंवा तुमच्या एअरटॅगला ॲपद्वारे सूचना दिल्यात तर ते आवाज करू शकतं जेणेकरून तुम्ही  एअरटॅग सहजरित्या शोधू शकता.

Image By – Apple

एअरटॅगद्वारे ॲपल एक जागतिक नेटवर्क बनवू पाहतंय ज्यात काही अडथळे देखील आहेत पण एकूणच ॲपलने एअरटॅगच्या वापरा संबंधित विस्तृत संशोधन केलेलं आहे आणि एअरटॅगचा गैरवापर रोखण्यासाठी उपाय देखील ठेवले आहेत. पण एअरटॅग आणि “फाईन्ड माय” नेटवर्कच अस्तित्व हे पूर्णतः आयफोन आणि इतर ॲपल उपकरणांच्या संख्येवर अवलंबून आहे. समजा तुमची बॅग ज्यात एअरटॅग आहे जी माळरानावर हरवली आणि तिथे कोणतंच ॲपल उपकरण नाहीये तर ती तुम्ही शोधू शकणार नाही कारण एअरटॅग मध्ये जी.पी.एस. नाहीये.

Image By – Apple

एअरटॅग तुम्ही तुमच्या बॅगमध्ये सहजरित्या ठेवू शकता पण जर तुम्हाला एअरटॅग चावी सोबत वापरायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ऍक्सेसरी स्वतंत्रपणे विकत घ्यावी लागेल.

ॲपल टिव्ही 4K

या कार्यक्रमात ॲपलने ॲपल टिव्ही 4K सादर केला. बॉक्सच्या डिजाईन मध्ये काही विशेष बदल करण्यात आलेले नसले तरीही रिमोट मध्ये बदल केले आहेत. रिमोटवरील स्क्रोलरद्वारे फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड जाणे आता सोपे झाले आहे. 

Image By – Apple

ॲपल टिव्ही 4K मध्ये A12 बायोनिक हि चिप देण्यात आली आहे आणि स्टोरेज साठी ३२ आणि ६४ जीबी चे पर्याय देण्यात आले आहेत.

ॲपल टिव्ही 4K मध्ये पिक्चर क्वालिटी सेट करण्यासाठी आयफोनच्या कॅमेऱ्याचा वापर करता येणे आता शक्य आहे. दोन उपकरणं कोणत्याही वायर शिवाय एकमेकांशी संपर्क साधतात हे बघणं फारच भविष्यकालीन वाटतं. 

Image By – Apple

आयमॅक (एम.वन चिप)

Image By – Apple

ॲपलच्या एम.वन चिपने संगणक विश्वात नवीन पायंडा पाडला आहे. ॲपल एक-एक करून त्यांचे सर्व संगणक एम.वन चिपसहित सादर करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला आयमॅक आता एम.वन चिपसहित ७ नवीन रंगात सादर करण्यात आला आहे. हा आयमॅक पूर्णपणे नव्याने डिजाइन करण्यात आला आहे आणि पुढील पूर्ण बाजूस फक्त एक अखंड काच वापरण्यात आली आहे. आयमॅकमध्ये २ छोटे फॅन देण्यात आले असले तरीही ॲपलच्या मते आयमॅक अजिबात आवाज करीत नाही.      

यात 24 इंच 4.5K रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचसोबत 1080p कॅमेरा, 3 मिक्रोफोनचा संच आणि 6 स्पिकर्स देण्यात आले आहेत.   

Image By – Apple

या आयमॅकसाठी नवीन मॅग्नेटिक पॉवर कनेक्टर आणि नवीन पॉवर अडॅप्टर ज्यात आता ईथरनेट केबल बसविणे शक्य आहे या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

Image By – Apple

तसेच नवीन किबोर्ड (टच आयडी सहित), माउस आणि टचपॅडचा देखील समावेश करण्यात आला आहे.

आयपॅड (एम.वन चिप)

एम.वन चिपसहित सादर करण्यात आलेला आयपॅड आणि आयपॅड प्रो मध्ये ५० टक्के सीपीयू परफॉर्मन्स वाढला तर ४० टक्के ग्राफिक्स परफॉर्मन्स वाढला आहे. एकीकडे  आयपॅडचा परफॉर्मन्स वाढला असला तरीही बॅटरी संपूर्ण दिवस चालते. नवीन आयपॅडवर तुम्ही एक्स.बॉक्स कंट्रोलर सहित गेम्स खेळू शकता. 

Image By – Apple

आयपॅड प्रो मध्ये लिक्विड रेटिना एक्स.डी.आर. डिस्प्ले देण्यात आला आहे जो १००० नीट्स पर्यंत ब्राईट होऊ शकतो. स्टोरेज कॅपॅसिटी देखील वाढवून २ टेराबाईट्स पर्यंत शक्य करण्यात आली आहे. 

या आयपॅडमध्ये 5G तंत्रज्ञान देण्यात आलं आहे. तसेच यातील फ्रंट कॅमेऱ्यामध्ये “सेंटर स्टेज” फिचर देण्यात आलं आहे जे तुम्हाला व्हिडिओ कॉल मध्ये कॅमेऱ्याच्या मध्यभागी ठेवतं.  

निष्कर्ष

कोव्हिडमुळे “स्प्रिंग लोडेड” कार्यक्रम ऑनलाईन प्रसारित करण्यात आला पण ॲपलने या कार्यक्रमात विडिओ मेकिंगची परिसीमा गाठली. जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान कंपनी म्हणून शोभेल असाच भव्यदिव्य कार्यक्रम ॲपलने सादर केला. कार्यक्रमाची “प्रोडक्शन व्हॅल्यु” प्रशंसनीय आहे. एका तासाच्या या कार्यक्रमात ॲपलने आपलं तंत्रज्ञान क्षेत्रातील नाणं खणखणीत आहे हे दाखवून दिल. ॲपलची हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ची एकसंध प्रणाली मानवाला भविष्यकालीन वाटचालीस मदत करेल यात शंका नाही.

Image By – Apple

या कार्यक्रमात ॲपलने जाहीर केलं कि ॲपलचे सर्व प्रोडक्ट्स, त्यांचे दळण-वळण २०३० पर्यंत “कार्बन न्यूट्रल” असतील. ॲपलच्या या घोषणेमुळे इतर कंपन्यादेखील “कार्बन न्यूट्रल” होण्यासाठी प्रयत्न करतील जे एकूणच पर्यावरणासाठी उत्तम आहे. याचाच एक अर्थ असाही होऊ शकतो कि ॲपल कार लवकरच अस्तित्वात येणार. 

apple spring loaded airtag ipad pro imac tv 4k purple iphone m1 chip akash jadhav


संबंधित व्हिडिओ


Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

2 Responses

  1. Pratik says:

    Great article, Very impressed with the detailed information. Can you please do one article on Bitcoin or Ethereum?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.