अँड्रॉइड १२ डेव्हलपर प्रिव्हयु

परिचय

काही दिवसांपूर्वी गूगलने अँड्रॉइड १२ चा डेव्हलपर प्रिव्हयु (सॉफ्टवेअर बाजारात आणण्यापूर्वी सॉफ्टवेअर डेव्हलोपर्सना वापरून बघण्यासाठीची आवृत्ती) खुला केला.  हा डेव्हलपर प्रिव्हयु तुम्ही देखील तुमच्या स्मार्टफोनवर  (पिक्सेल फोन) इन्स्टॉल करू शकता. पण असं न करता पब्लिक बिटा आवृत्तीची वाट बघणं योग्य राहील कारण डेव्हलपर प्रिव्हयु मध्ये असंख्य चुका असू शकतात आणि दैनंदिन वापरात तुमची त्यामुळे गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Source – 9to5Google

अँड्रॉइड १२ च नाव (गूगल अँड्रॉइडच्या प्रत्येक आवृत्तीला गोड पदार्थच नाव देतं) काय असेल या बाबत उत्सुकता तर आहेच. काहींच्या मते हे नाव “स्नो कोन” असण्याची दाट शक्यता आहे कारण अँड्रॉइड १२ च्या सोर्स कोडच नाव “sc” आहे. मे किंवा जून महिन्याच्या आसपास अँड्रॉइड १२ बद्दल घोषणा होण्याची शक्यता आहे.    

अँड्रॉइड १२ डेव्हलपर प्रिव्हयु मध्ये करण्यात आलेले बदल पुढील प्रमाणे आहेत:   

वन हँडेड मोड

मोठे फोन एका हाताने वापरताना होणारा त्रास लक्षात घेता या फिचर द्वारे तुम्ही एका हाताने स्क्रीनच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहचू शकता.

Source – 9to5Google

प्रायव्हसी टोगल

नोटिफिकेशन सेंटरमध्ये कॅमेरा आणि मायक्रोफोनचा ऍक्सेस सर्व अँप्ससाठी एका बटनावर चालू/बंद करण्यासाठी हे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत.    

Source – 9to5Google

मिडिया प्लेयर डिझाईन

मिडिया प्लेयरच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आलेले असले तरी रंग तोच ठेवण्यात आला आहे. नोटिफिकेशन सेंटर आणि लॉक स्क्रीनमध्ये  मिडिया प्लेयर कंट्रोलला आणि अल्बम आर्टला अधिक महत्व देण्यात आलं आहे.

Source – 9to5Google

सेटिंग अँप डिझाईन

सेटिंग अँपच्या डिझाईनमध्ये काही बारीक सारीक बदल दिसून आले आहेत जस कि सर्चबारचा आकार बदलला आहे प्रोफाईल फोटो मोठा करण्यात आला  आहे त्याच बरोबर प्रत्येक सबसेक्शन मध्ये बॅकग्राउंड कलर देण्यात आला आहे जो नंतर सिस्टीम थीमला मॅच करेल.

Source – 9to5Google

टोगल बटन

टोगल बटन जस कि वाय-फाय, ब्लु-टूथ ऑन-ऑफ बटन यांना बदलण्यात आलं आहे हा बदल बारीक असला तरी आय.ओ.एस. पेक्षा वेगळं  डिझाईन बनविण्याकडे गूगल लक्ष देतय.

अँप शॉर्टकट

अँप वर लॉन्ग प्रेस केल्यानंतर दिसणारं अँप शॉर्टकट आणखी मोठं करण्यात आलं आहे आणि एका हाताने ऍक्टिव्हिटीचा क्रम बदलणे तिथेच शक्य झाले आहे.

निअरबाय शेअर

निअरबाय शेअर या फिचर द्वारे आता तुम्ही वाय-फायचा पासवर्ड अगदी सहज रित्या इतर स्मार्टफोन्सना शेअर करू शकता.

Source – 9to5Google

स्क्रिनशॉट टूल

या टूल मधून आता तुम्ही स्क्रिनशॉटवर टेक्स्ट आणि ईमोजी ऍड करू शकता. स्क्रिनशॉट घेतल्यानंतर, स्क्रिनशॉट डावीकडे सरकवल्यास तो सेव्ह होतो तर उजवीकडे सरकवल्यास स्क्रिनशॉट टूलमध्ये तो ओपन होतो.

Source – 9to5Google

नोटिफिकेशन

नेहमी प्रमाणेच यावेळी देखील गुगलने नोटिफिकेशनमध्ये बदल केले आहेत. यावेळी नोटिफिकेशन अधिक पारदर्शक करण्यात आले आहे आणि नोटिफिकेशन काही वेळासाठी बंद करण्यासाठी तिथेच पर्याय देण्यात आला आहे.

Source – 9to5Google

लाँन्चर ग्रीड

डेव्हलपर प्रिव्हयु मध्ये अँड्रॉइड ११ च्या तुलनेत अधिक ग्रीड लेआऊट देण्यात आले आहेत. यामुळे स्क्रीनवर वेगवेगळ्या ग्रीडमध्ये तुम्ही अँप बसवू शकता आणि या पर्यायामुळे वेगवेगळ्या आकाराच्या स्मार्टफोन्सना फायदा होईल.

Source – 9to5Google

निष्कर्ष

अँड्रॉइड १२ चा डेव्हलपर प्रिव्हयुमध्ये बरेचसे बारीक सारीक बदल करण्यात आले आहेत जे सामान्य युजर्सना कदाचित चटकन समजून पण येणार नाहीत पण असेच बारीक सारीक बदल घडवत एक परिपूर्ण सॉफ्टवेअर तयार होत असत. त्यात अँड्रॉइडचे जागतिक स्तरावर वापरकर्ते आहेत. प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने अँड्रॉइड वापरत असतो त्यामुळे गुगल इंजिनिअर्सना विचारपूर्वक बदल करावे लागतात. अँड्रॉइड १२ गोपनीयतेसाठी देखील एक नवीन पायंडा घालून देईल अशी अपेक्षा आहे कारण सध्या गोपनीयतेचा प्रश्न जगभर गाजतोय. अँड्रॉइड १२ वर अजूनही काम सुरू आहे आणि गूगलतर्फे त्याबद्दल काही अधिकृत घोषणा अजून तरी करण्यात आलेली नाहीतरीही अँड्रॉइड आणि पिक्सेल फोनचे वापरकर्ते त्याची आवर्जून वाट बघत आहेत.     

android 12 developer preview akash jadhav google


संबंधित व्हिडिओ             


Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.