6G

परिचय

जलदगती इंटरनेट पृथ्वीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर उपलब्ध झालं कि मानवजातीचे सगळे प्रश्न सुटतील असा समज बहुधा इंजिनीअर्स झाला असावा. म्हणूनच कि काय 5G तंत्रज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहचायच्या आधीच 6G तंत्रज्ञानवर काम सुरु करण्यात आलं आहे. अजून 6G तंत्रज्ञान किमान एक दशक दूर आहे त्याची नियमावलीसुद्धा तयार झालेली नाही पण 6G वर जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत कारण एका जागतिक कंपनीने  6G तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इंजिनीअर्सची भरती करायला सुरुवात केली आहे आणि त्यातच चीनने अमेरिकेला शह देण्यासाठी 6G सॅटेलाईट अवकाशात सोडली आहे. आता 6G फक्त जलदगती इंटरनेट पुरवणारी सेवा राहिली नसून राष्ट्रीय अस्मितेचा भाग बनत चालला आहे. 6G (जनरेशन ६) हे सेल्ल्युलर तंत्रज्ञानची सहावी पिढी असेल आणि जलदगती इंटरनेट सेवा ग्राहकांना पुरविणे हा मुख्य हेतू असेल. 

Source – The Tribune

इंटरनेशनल टेलिकम्युनिकेशन युनिअनच्या मते दर १० वर्षांनी नवीन जनरेशन यायला हवी त्यानुसार 6G अस्तित्वात यायला २०३० पर्यंत वाट बघावी लागेल.

तंत्रज्ञान

6G तंत्रज्ञान नक्की कस काम करेल याबद्दल काहीही ठोस माहिती सध्या उपलब्ध नाही. 6G येण्यासाठी दशकभराचा कालावधी असल्याने इंजिनीअर्स 6G बद्दल काल्पनिक मनोरे बांधत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार तरी 6G मध्ये त्या सर्व गोष्टी असतील ज्या 5G तंत्रज्ञानच्या त्रुटी आहेत. 5G तंत्रज्ञान सध्या असलेली सर्वात मोठी त्रुटी म्हणजे रेंजची मर्यादा. जर हि मर्यादा 6G मध्ये भरून काढण्यात आली तर हा एक नक्कीच मोठा बदल असेल.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाने दावा केला आहे कि गॅलियम नाईट्रेड आणि हाय इलेक्ट्रॉन  मोबिलिटी ट्रान्समीटर वापरून बनविण्यात आलेलं उपकरण हाय-फ्रिक्वेन्सी विद्युत लहरी वापरण्यास सक्षम आहे. २०२० मध्ये सिंगापोर आणि जपानच्या युनिव्हर्सिटीने 6G साठी चिप बनवली आहे.

निष्कर्ष

6G तंत्रज्ञान मुख्यत्वे हाय-फ्रिक्वेन्सी विद्युत लहरी द्वारे जास्तीत जास्त डेटा प्रसारित करणे आणि तो डेटा वापरणे याभोवती तयार होईल. त्याचबरोबर रेंज ची समस्या सोडवण्यावर भर असेल. अजूनही 6G बद्दल स्टॅंडर्ड प्रस्थापित झालेले नसल्याने त्याचे काय फायदे-तोटे आणि त्रुटी असतील याबद्दल सांगता येन शक्य नाही. पण नवीन रोजगार नवनवीन संधी आणि 6G तंत्रज्ञानच्या अवतीभोवती इकोसिस्टिम तर नक्कीच तयार होईल. 

6g akash jadhav


संबंधित व्हिडिओ


Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.