5G

परीचय

देशात 4G नेटवर्क मुळे अमुलाग्र बदल झाले आहेत. त्यातील सर्वांत मोठा बदल म्हणजे डिजिटल पेमेंट्सला मिळालेली पसंती. कदाचित हा बदल ३G नेटवर्कमुळे शक्य झाला नसता. 4G नेटवर्क मुळे जलद-गती इंटरनेटची आवश्यकता सर्वांना कळून चुकली आहे. 4G नेटवर्कपेक्षा अधिक जलद-गतीने इंटरनेट सेवा पुरवणारं नेटवर्क म्हणजेच 5G (जनरेशन 5) लवकरच सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याची चिन्ह दिसत आहेत. हि पोस्ट लिहिताना (फेब्रुवारी २०२१ मध्ये) जागतिक पातळीवर काही मोजक्या कंपन्यांनी (व्हेरिझॉन, टी-मोबाईल, ए. टी. अँड टी.) 5G टेस्ट पूर्ण केली आहे तर बोटावर मोजता येतील इतक्या ठिकाणी 5G सेवा लोकांसाठी खुली करण्यात आली आहे आणि काही मोजकेच फोन बाजारात उपलब्ध आहेत जे 5G सेवा वापरू शकतात. देशात जिओ आणि एअरटेल या बलाढ्य कंपन्या 5G ची शर्यत जिंकण्यासाठी तयारीत आहेत. त्यात जिओ आघाडीवर असून देशी बनावटीचे 5G तंत्रज्ञान विकसित करत असल्याचं बोललं जातंय.

इतिहास

१९८० च्या दशकातील मोबाईल फोन (मोटोरोला डायना TAC) 1G नेटवर्क वापरत असत. या नेटवर्कवर फक्त फोन करण्याची सुविधा उपलब्ध होती.

१९९० च्या दशकात 2G नेटवर्कवरून एस.एम.एस. आणि एम.एम.एस. पाठविता येन शक्य झालं.

२००० च्या दशकात 2G नेटवर्कवर बेसिक इंटरनेट सेवा वापरता येऊ लागली.

२००८ सालापासून 3G नेटवर्कने इंटरनेट स्पीड काही प्रमाणात वाढला.

२०१४ सालापासून 4G नेटवर्कमुळे खऱ्या अर्थाने जलद-गती इंटरनेट सेवा सर्वदूर उपलब्ध झाली.  

5G म्हणजे काय?

जनरेशन 5 नेटवर्क हे एक सेल्युलर नेटवर्क सोप्या भाषेत तुमच्या फोनच्या सिमकार्डवर इंटरनेट पुरवणारी सुविधा आहे. 5G तंत्रज्ञानामुळे अतिजलद-गतीने इंटरनेट सेवा वापरणे शक्य होणार आहे. हि सेवा फक्त स्मार्टफोनसाठी मर्यादित नसून लॅपटॉप, डेस्कटॉप आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) उपकरणांमध्ये देखील वापरता येईल.     

5G तंत्रज्ञान

मुळात 5G हे सेल्युलर रेडिओ तंत्रज्ञानाचा आधुनिक भाग आहे पण हा काही नवीन शोध नाही. सेल्युलर नेटवर्कसाठी इलेक्ट्रो-मॅग्नेटिक (विदुयत चुंबकीय लहरी) चा वापर होतो. त्याच लहरींमधील एका रेंज (फ्रिक्वेन्सी) मधील (मायक्रो-वेव्ह) लहरी 5G साठी वापरतात. मायक्रो-वेव्ह तंत्रज्ञानात झालेली प्रगती जस कॅरिअर अग्ग्रीगेशन तंत्रज्ञान, मल्टीपल इनपुट मल्टीपल आउटपुट अँटेना आणि सॉफ्टवेअरमध्ये झालेले आधुनिक बदल यामुळे मायक्रो-वेव्ह द्वारे जास्त बॅण्डविड्थ साधने शक्य झालं आहे. 5G मायक्रो-वेव्हना तीन प्रकारात विभागता येऊ शकत:

Source – Carritech

१: हाय-बॅण्ड – या मध्ये २० जी-बिट्स पर्यंत स्पीड शक्य आहे पण या विदुयत-लहरी खूप कमी अंतरापर्यंत उपलब्ध असतात.

२. मिड-बॅण्ड – कदाचित भविष्यात या विदुयत-लहरी सर्वात जास्त वापरल्या जाऊ शकतात कारण याची बॅण्डविड्थ 4G पेक्षा जास्त आहे आणि उपलब्धता हाय बॅण्डविड्थ लहरींपेक्षा जास्त आहे.         

३. लो-बॅण्ड – स्पीड 4G पेक्षा थोडा अधिक आणि रेंज 4G पेक्षा थोडी कमी.

फायदे

१. 5G मुळे अतिजलद इंटरनेट सर्वदूर पोहचलं तर सेल्फ ड्रायविंग (स्वयंचलित) कार्स रस्त्यावर धावताना दिसतील.

२.डॉक्टर्स दूर कुठेतरी बसून ऑपरेशन करू शकतील.

३.व्हर्च्युअल रिऍलिटी (आभासी जग) आणि संबंधित सॉफ्टवेअरना चालना मिळेल.

त्रुटी आणि वाद

१. 5G मुळे इंटरनेट स्पीड अमाप वाढला तरी सध्याच्या स्थितीला 5G नेटवर्क देशव्यापी स्तरावर उपलब्ध करून देणं मोठं आव्हान आहे.

२. 5G लहरींची रेंज खूपच कमी असल्याने (सध्या तरी) त्याचे टॉवर शोधून त्या जवळ इंटरनेट वापरावं लागत आणि या लहरी भिंतीना भेदून जात नाहीत.

३. या लहरी मानवी शरीरावर विपरीत परिणाम करतात असं बोललं जातंय पण ते सिद्ध करण्यासाठी सबळ शास्त्रीय पुरावे नाहीयेत.

निष्कर्ष

काही वर्षातच 5G नेटवर्क दैनंदिन वापरात येईल त्यामुळे नवीन संधी निर्माण होतील नवीन आव्हाने येतील, चांगले परिणाम साधता आले तर जग आणखी जवळ येईल, माहिती सहजरित्या उपलब्ध होईल आणि नवीन रोजगार निर्माण होतील. एकूणच सर्व गोष्टी लक्षात घेता 5G मुळे मानवी जीवनात नवीन क्रांती होणार हे नक्की!

5g akash jadhav cellular network


संबंधित व्हिडिओ


Share

आकाश जाधव

Software Engineer | Tech Enthusiast & Proud Geek

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.